TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 12 जून 2024 ABP Majha
राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी.
नाशिकच्या चांदवड इथे आसरखेडे गावात ढगफुटीसदृश पाऊस, द्राक्ष बागांना पावसामुळे नदीचं स्वरुप, गेल्या दोन दिवसांपासून चांदवडमध्ये पाऊस सुरु.
हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, शहरातील मस्तानशहा नगरमध्ये नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, नालेसफाईच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित.
नागपूरच्या कळमना भागात पाऊस, अचनाक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा, कळमना वगळता उर्वरीत भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा.
सोलापूर शहरातही पावसाची हजेरी, सर्वसामान्यासह बळीराजाही सुखावला.
हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस, वसमत शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं, पहिल्याच पावसात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यानं नागरिक हैराण.
यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, कळंब, आर्णी, दारव्हासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, खरीब हंगामातील पिकांच्या लागवडीला सुरुवात.