Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?
Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीआधी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापुस्तकात असं लिहण्यात आलं आहे, जे नेते भाजपसोबत गेले त्यांनी शरद पवारांना अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवार यांनी भाजप पक्षासोबत जाण्यासाठी नकार दिला. हे सांगत राहिले ईडी, आयकर विभागाचा त्रास होतो आहे. तुम्ही बीजेपी बरोबर चला त्यावर पवार म्हणाले, मी भाजपसोबत जाणार नाही हे या पुस्तकात लिहिलेलं आहे, असं आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं. फडणवीसांच्या फेक नॅरेटिव्हच्या टिकेवर उत्तर फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक आहेत, तर व्यवस्थापिका सुप्रिया सुळे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहलं यातलं काहीही खोटं असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं,' असं खुलं आव्हान सुप्रिया सुळेंनी यावेळी फडणवीसांना दिलं आहे. फडणवीस यांनी त्या फाईलवर सही केली... अजित पवारांवर पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवाराच्या त्या फाईलवर त्यांनी सही केली. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आरोप केले, त्यानंतर फाईलवर सही केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांना फाईल दाखवली, ते मुख्यमंत्री असताना कारवाई केली, त्यांनी फाईल दाखवली देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर खटला दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी सुप्रिया सुळेंनी केली आहे. एका पुस्तकातील दावा अतिशय गंभीर विषय आहे, मी अनेकदा बोलले आहे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे मी गेले अनेक दिवस बोलत आहे, काश्मीर टू कन्याकुमारी मध्ये ईडी सीबीआय, आयकर विभाग यांचा 95 टक्के वापर केला आहे. याचा दावा केला आहे, वॉशिंग मशीन मध्ये टाकून भाजप सरकार स्थापन करत आहे. यामध्ये महिलाचा उल्लेख आहे, या अदृश्य शक्तीने माझ्या बहिणीच्या घरी रेड केली, पाच दिवस धाड टाकली, ईडीने त्रास दिला, भुजबळ, मलिक, राऊत यांचे कुटुंब कशातून गेले असतील.