Swapnil Kusale :स्वप्नीलच्या वडिलांना कडकडून मिठ्ठी,शुभेच्छा देण्यासाठी MLA Prakash Abitkar घरी
Swapnil Kusale :स्वप्नीलच्या वडिलांना कडकडून मिठ्ठी,शुभेच्छा देण्यासाठी MLA Prakash Abitkar घरी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात तिसरं पदक जमा झालं असून नेमबाजीतच कांस्यपदक मिळालं. याआधी मनु भाकरने एकेरी आणि मिश्र अशा दोन्ही प्रकारात पदक पटकावलंय. यानंतर कोल्हापुरच्या स्वप्निल कुसाळे यानं ५० मीटर रायफल ३ पोजिशन प्रकारात कांस्यपदक पटकावलं. पहिल्या फेरीअखेर तो सहाव्या स्थानी होता. मात्र त्यानंतर त्याने कामगिरी सुधारत अंतिम तिघांमध्ये स्थान मिळवलं. पण शेवटी थोडक्यात त्याचं रौप्य पदक हुकलं. स्वप्निल कुसाळेने पटकावलेलं पदक महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ७२ वर्षांनी ऑलिम्पिक पदक मिळालंय.


















