एक्स्प्लोर

शॉकिंग ! ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरीची चिंता असह्य, बीडमध्ये बापानं टोकाचं पाऊल उचललं

सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलीच्या शिक्षणाचे कसे होईल? असा प्रश्न त्यांना सतावत होता. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली.

Beed: महाराष्ट्रात आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलेला असताना बीडमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाथापूर गावातील गोरख नारायण देवडकर या 50 वर्षीय व्यक्तीने ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून आत्महत्या किल्ल्याची माहिती समोर येत आहे. सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलींच्या शिक्षणाचे कसे होईल असा प्रश्न त्यांना सतावत होता. यात विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. 

नेमकं प्रकरण काय?

राज्यभरात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आक्रमक वातावरण पाहायला मिळत असताना बीड तालुक्यातील नाथापुर गावात गोरख नारायण देवडकर या 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ओबीसी आरक्षण जात असल्याच्या विवंचनेतून  या व्यक्तीने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले. गोरख देवडकर यांना पाच मुली असून दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलीच्या शिक्षणाचे कसे होईल? असा प्रश्न त्यांना सतावत होता. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात देवडकर यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून राज्य सरकारने आमच्या कुटुंबाचा विचार करावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. 

मुलींच्या शिक्षणाची चिंता, बापाने टोकाचे पाऊल उचलले

आपल्या वडिलांच्या आत्महत्या नंतर त्यांच्या मुलीने सांगितले, " जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तेव्हापासून माझे वडील सातत्याने चिंतेत होते. कारण त्यांना माझ्या नोकरीची जास्त चिंता होती. त्यांनी मजुरी करून आमच्या नोकऱ्यांसाठी पैसा लावलाय. आधीच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. आता त्यामध्येच मराठा समाज आला आहे. आपल्या मुलींचा कसं होईल? असं ते सतत मला बोलायचे. या चिंतेतून त्यांनी असं टोकाचे पाऊल उचललं. हे सांगताना मुलीच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते.  वडील मजुरी करायचे जे मिळेल ते काम करायचे. मुलींची आई ही मजुरी करते. तीन बहिणींचे लग्न झाले आहेत. दोघी बहिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत.

देवडकर यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे. घटनेनंतर गोरख देवडकर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे. या आत्महत्येची माहिती समजताच नाथापूरसह परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.बीडमध्ये काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाच्या चिंतेतून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.  बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे मराठा समाजातील तरुण नितीन माणिकराव चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण जाणार या संभ्रमातून आणि मुलींच्या भविष्याच्या चिंतेतून एका 50 वर्षीय व्यक्तीने जीव संपवल्याचं समोर आलं  आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget