ITR Filing Last Chance : आयटीआर भरण्यासाठी उरले काही तास, रिटर्न फाईल न केल्यास 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार
ITR Deadline : असेसमेंट वर्ष 2025-26 साठी आयटीआर फाईल करण्यासाठी शेवटचे काही तास बाकी आहेत. सीबीडीटीनं यावर्षी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती.

नवी दिल्ली : करदात्यांना आयटीआर फाईल करण्यासाठी शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळं ज्यांनी अद्याप आयटीआर फाईल केला नाही त्यांनी तातडीनं आयटीआर फाईल करणं आवस्यक आहे. 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाईल न केल्यास करदात्यांना 5000 रुपयांपर्यंत दंड द्यावा लागू शकतो.
आयटीआर फाईल करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी आहे. करदाते उद्यापर्यंत इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं करदात्यांना या वर्षी आर्थिक वर्ष 2024-25चा म्हणजेच असमेसमेंट इयर 2025-26 च्या इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी मुदत 15 सप्टेंबरपर्यंत दिली होती. यापूर्वी आयटीआर फाईल करण्याची मुदत 31 जुलै पर्यंत असायची.
यंदा आयटीआर फॉर्ममध्ये काही दुरुस्त्या केल्यानं मुदतवाढ देण्यात आली होती. आयटीआर फॉर्ममधील अपडेट, फायलिंग सिस्टीममधील आवश्यक बदल आणि TDS क्रेडिट रिफ्लेक्शनसाठी होणारा उशीर याबाबतचे बदल करण्यासाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले होते.
आयटीआर विभागाकडून निश्चित केलेल्या तारखेपर्यंत आयटीआर फाईल करणं आवश्यक आहे. जर करदाते आयटीआर दिलेल्या वेळेत फाईल करण्यात अपयशी ठरले तर त्यांना इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 234F नुसार डेडलाईन नंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना ज्यांना कर द्यायचा आहे त्यांना दंड द्यावा लागेल. कमाल दंडाची रक्कम 5000 रुपये आहे. ज्या करदात्याचं उत्पन्न 500000 लाख रुपये आहे त्यांना 5000 रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल. ज्यांचं उत्पन्न 50000 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 1000 रुपये दंड द्यावा लागेल.
आयटीआर फायलिंग करण्यास विलंब केल्यास फक्त दंड नाही तर आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सातत्यानं क न भरणाऱ्या आणि जाणीवपूर्वक करचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. ज्यामध्ये तीन महिने ते दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
रिपोर्टनुसार आयटीआर फाईल करण्यासाठी दिलेल्या 15 सप्टेंबरच्या तारखेत कोणताही बदल होणार नाही. मात्र, दंडासह विलंबित आयटीआर फाईल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. काल इन्कम टॅक्स विभागानं दिलेल्या माहितीनुसार 6 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केला आहे.
Thank you taxpayers & tax professionals for helping us reach the milestone of 6 crore Income Tax Returns (ITRs) as of now and still counting.
— Income Tax India (@IncomeTaxIndia) September 13, 2025
To assist taxpayers for ITR filing, tax payment and other related services, our helpdesk is functioning on a 24x7 basis, and we are… pic.twitter.com/XBJUrzoBjd
























