Suraj Chavan ED Arrest : सूरज चव्हाण ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात ,खिचडी घोटाळा प्रकरणी ईडी कारवाई
Suraj Chavan ED Arrest : सूरज चव्हाण ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर,खिचडी घोटाळा प्रकरणी ईडी कारवाई
फक्त राजन साळवीच नाही तर ठाकरेंच्या आणखी एका नेत्याला कालच अटक झालीय.. मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं... आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांची ओळख आहे. आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तींयावर पहिल्यांदाच ईडीकडून कारवाई करण्यात आलीय. कोविड काळात मुंबई महापालिकेतल्या खिचडी घोटाळ्या प्रकरणात सूरज चव्हाण यांची ईडीकडून याआधी चौकशी करण्यात आली होती. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक, तसंच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा त्यांचा आकडेवारीसह उत्तम अभ्यास आहे.