Supriya Sule on Haryana : हरियाणात भाजपची आघाडी; सुळे म्हणाल्या 4 पर्यंत थांबा ABP MAJHA
Supriya Sule on Haryana : हरियाणात भाजपची आघाडी; सुळे म्हणाल्या 4 पर्यंत थांबा ABP MAJHA
मुंबई: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. सकाळी आठ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप मोठ्या पिछाडीवर पडला होता. मात्र, नंतरच्या भाजपने(BJP) मोठी मुसंडी मारत हरियाणात तिसऱ्यांदा सत्तास्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. हरियाणात सत्तास्थापनेसाठी 46 चा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार 49 जागांवर आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या बहुतांश फेऱ्या पार पडल्याने हरियाणात भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.
शेतकरी (Farmers) आणि कुस्तीपटूंचे आंदोलन असंवेदनशीलपणे हाताळल्याने देशभर नाचक्की झाल्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Elections Results) भाजपला फटका बसेल, अशी शक्यता होती. या प्रतिकूल परिस्थितीमुळे बहुतांश एक्झिट पोल्समध्येही भाजपचा पराभव होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्ष निकालावर नजर टाकल्यास वेगळी परिस्थिती दिसत आहे.