Special Report Aditi tatkare On Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेमुळे शिक्षकांचे पगार उशीराने?
Special Report Aditi tatkare On Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेमुळे शिक्षकांचे पगार उशीराने?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार पुन्हा येण्यास महत्त्वाची ठरली. राज्य सरकारकडून महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 9000 हजार रुपये पोहोचले आहेत. मात्र, ही योजना यशस्वी करुन दाखवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यास शासन विसरल्याचं चित्र आहे. अंगणवाडी सेविकांना एका फॉर्मला 50 रुपये देण्यात येतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप अंगणवाडी सेविकांना त्यांनी भरलेल्या अर्जांची रक्कम मिळालेली नाही. आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी आहोत, आम्हाला आम्ही केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे, असं अंगणवाडी सेविकांनी म्हटलं.
राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या योजनेचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित आहेत.