Sillod : इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे, Abdul Sattar यांचे आदेश; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात लाठीचार्ज करण्यात आला आहे. सिल्लोड या ठिकाणी बुधवारी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला. धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असेही सत्तार म्हणाले.






















