Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
एकीकडे राज्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) विरुद्ध उमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे वाद आणि नाराजीनाट्य सुरू असतानाच ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या (Shivsena Shinde vs BJP) पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सदर प्रकरणानंतर पोलिसांनी एनसी देखील दाखल करुन घेतली आहे. काल (20 नोव्हेंबर) रात्री उशिरा पोलिसांस सदर प्रकरणाबाबत तक्रार देण्यात आली.शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडीक, शाखाप्रमुख आणि महेश लहाने, उपविभागप्रमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. भाजपचे माजी आणि जेष्ठ नगरसेवक नारायण पवार (Bjp Narayan Pawar Thane) यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.






















