एक्स्प्लोर
Shivsena : शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांची ED कडून आठ तास चौकशी : Abp Majha
प्रताप सरनाईक, अनिल परब यांच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेना आमदार रविंद्र वायकर ईडीच्या रडारवर आहेत. रवींद्र वायकर यांची ईडीकडून काल आठ तास चौकशी करण्यात आली. वायकर यांना ईडीनं नेमक्या कोणत्या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रवींद्र वायकर काल दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले. कालच्या चौकशीतून नेमक्या कोणत्या बाबी समोर आल्या आहेत, हेही अस्पष्ट आहे. आमदार वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आता यावरुन तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















