Sharad Pawar On Mahavikas Aghadi : आमची आघाडी हाच आमचा चेहरा, शरद पवार स्पष्टच म्हणाले
Sharad Pawar On Mahavikas Aghadi : आमची आघाडी हाच आमचा चेहरा, शरद पवार स्पष्टच म्हणाले
हे देखील वाचा
मोठी बातमी! राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Maharashtra Monsoon Session : राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' (Chief Minister Pilgrimage Scheme) सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत नियम ठरवू
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबात नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे
ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु असे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेचा आशिर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.