Sharad Pawar on Amol Kolhe : शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं थेट समर्थन, औरंगजेब- रावणाचा दाखला
Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या Why I Killed Gandhi या चित्रपटामुळे चर्चेत या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेकांनी कोल्हे यांचा निषेध केला आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र अमोल कोल्हे यांना थेट समर्थन दिलं आहे.
पवार यांनी आज म्हटलं की, गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले. विशेष म्हणजे कोल्हे यांच्या या चित्रपटाचा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.






















