(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saroj Patil on Pawar Meet :शरद पवार, अजितदादांसह सगळं कुटुंब एकत्र, सरोज पाटलांनी सांगितलं काय चर्चा झाली
Saroj Patil on Pawar Meet :शरद पवार, अजितदादांसह कुटुंब एकत्र, सरोज पाटलांनी सांगितलं काय चर्चा झाली
पुणे : राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar Ajit Pawar meeting) यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार (Pratap Pawar) यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त भेट झाली. पुण्यातील बाणेरमध्ये (Baner Pune) प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील बहुतेक सर्वजण उपस्थित होते. प्रताप पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधील घरी शरद पवार गेले असताना, त्याठिकाणी अजित पवारदेखील याठिकाणी उपस्थित होते. शरद पवार हे त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त गेले होते. ही भेट संपूर्णपणे कौटुंबिक आहे, असं शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी एबीपी माझाला सांगितलं.
शरद पवार आणि अजित पवार यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. भेटीवेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
भेट राजकीय नव्हे कौटुंबिक
या भेटीबाबत शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील (Saroj Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. ही भेट राजकीय नव्हती. कौटुंबिक भेट होती असे सरोज पाटील म्हणाल्या. आम्ही सर्वजण एकत्र आल्यावर विनोद करतो, एकमेकांची मस्करी करतो असे सरोज पाटील म्हणाल्या. अजित पवार यांची तब्बेत चांगली आहे. खूप दिवसानंतर एकत्र भेटलो आम्हाला खूप आनंद झाला. सगळी भावंडं, मुली एकत्र भेटलो. आज प्रतापराव पवार यांचा वाढदिवसही होता, असं सरोज पाटील यांनी सांगितले.