Santosh Deshmukh Case : सीसीटीव्हीत केज शहरात आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आल्या असल्याचं उघड
Santosh Deshmukh Case : सीसीटीव्हीत केज शहरात आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आल्या असल्याचं उघड
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा पाय आणखी खोलात जाईल, असा पुरावा समोर आला आहे. हा वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जात आहे. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्यादिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हेदेखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्यादिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता सीआयडी आणि एसआयटीकडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.