एक्स्प्लोर

Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या

Sangli Crime News: मिरजेतील संबंधित मेडिकलवर छापा टाकून तब्बल 14 लाखाचे 1500 इंजेक्शन आणि 176 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सांगली: मिरज येथे  पोलिसांनी छापा टाकून मेफेन्टरमाइनचा (Mephentermine) मोठा साठा जप्त करून तिघांना अटक केली आहे. रोहित कागवाडे, ओंकार मुळे आणि आशपक पटवेगार अशी आरोपींची नावे आहेत. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिरजेत नशेचे मेफेन्टरमाइन इंजेक्शन (Mephentermine) विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून संशयीतांना अटक केली होती. यावेळी नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेन्टरमाइन इंजेक्शन त्यांच्याकडे आढळून आले.  या कारवाईमध्ये एका मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेन्टरमाइनचा साठा तेथून तो पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेतील संबंधित मेडिकलवर छापा टाकून तब्बल १४ लाखाचे १५०० इंजेक्शन आणि १७६ नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दरम्यान कोणताही परवाना नसताना नशेसाठी वापरले जाणारे मेफेन्टरमाइन इंजेक्शनची (Mephentermine) विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. दरम्यान सर्व संशयीतांनी नशेचे इंजेक्शन कोठून आणले व त्याची कोणत्या ठिकाणी विक्री केली जात होती, याचा देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेफेन्टरमाइन इंजेक्शनच्या तब्बल १५०७ बॉटल पोलिसांनी जप्त केल्या आहेत, १० मिलीच्या सर्व बॉटल आहेत. एकूण १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. इंजेक्शनचा विक्री व साठा केल्याप्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. आरोपीमधील एकाचे स्वतःचे मेडिकल आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.  यामागे मोठे रॅकेट असण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे, रॅकेट पर्यत पोचण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

आरोपीचे नाव व पत्ता

१) रोहित अशोक कागवाडे वय ४४ वर्षे रा. शामरावनगर, आकांशा मेडीकल वरील बाजुस, सांगली,
२) ओंकार रविंद्र मुळे वय २४ वर्षे रा. गव्हर्मेंट कॉलनी, विजय कॉलनी, विश्रामबाग सांगली व
३) आशपाक बशीर पटवेगार वय ५० वर्षे रा. असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर सांगली

जप्त मुद्देमाल

रु. ६,१६,६४१/- रु. किंमतीचे इंजेक्शन व गोळया इत्यादी मुद्देमाल.
रु. ८,३०,०००/- रु. किंमतीची चारचाकी व मोटारसायकल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Embed widget