RSS Special Report : सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही 'नमस्ते सदा वत्सले'
RSS Special Report : सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही 'नमस्ते सदा वत्सले' सरकारी कर्मचारीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उघडरीत्या सहभागी होऊ शकतील... आता सरकारी कर्मचारी ही संघाच्या शाखेत जाहीररीत्या उपस्थित राहू शकतील... कारण केंद्र सरकारने तब्बल 58 वर्ष जुना बंदी आदेश मागे घेतला आहे... 30 नोव्हेंबर 1966 रोजी केंद्रात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल शाखेत जाण्याबद्दल बंदी आदेश काढण्यात आले होते... त्यानंतर 1970 आणि 1980 मध्ये ही केंद्र सरकार कडून संबंधित बंदी आदेशाचे पुनरुच्चार करण्यात आले होते... त्यामुळे बरेचशे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघाच्या विचारसरणीचे असतानाही उघडरीत्या संघाच्या कार्यक्रमात किंवा शाखेत जाण्यास धजावत नव्हते... संघ विषयाचे जाणकार आणि तरुण भारत दैनिकाचे माजी संपादक सुधीर पाठक यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा स्वागत केलंय... मात्र, सुधीर पाठकांच्या मते 1966 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना केंद्र सरकारने जो बंदी आदेश काढला होता, मुळात तेव्हा तशी मागणी काँग्रेसने नाही तर डाव्या पक्षांनी केली होती आणि नुकतच पंतप्रधान पद सांभाळणाऱ्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाचा फारसा अनुभव नसताना डाव्यांच्या आग्रहास्तव तो बंदी आदेश लागू केला होता... उलट 1962 च्या युद्धानंतर देशात नैराश्याचे वातावरण असताना विविध क्षेत्रात, सामाजिक कामात संघाच्या स्वयसेवकांचा योगदान लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संघ स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी करून घेतले होते... त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी ही त्या काळात संघाचे स्वयंसेवक असायचे... मात्र, डाव्यांनी इंदिरा गांधींच्या अनुभवाहिनतेचा फायदा घेत त्यांच्याकडून तो निर्णय करून घेतला असं मत सुधीर पाठक यांनी व्यक्त केला आहे...