(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron variant : ओमिक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार का? राजेश टोपे म्हणाले...
Coronavirus new variant : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आढळल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यात कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर अनेक ठिकाणचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्याशिवाय एक डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आरोग्य सचिव या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.
राजेश टोपे यांनी म्हटले की, शाळेबाबत आरोग्य विभागाने परवानगी दिली असली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या बाबत अनुकलता दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.