(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray on Amit Thackeray : अमित ठाकरे विधानसभा लढवणार? राज ठाकरे म्हणाले, ठरलं नाही
विधानसभेला एससी, मुस्लीम समाजाचं मतदान मविआला मिळणार नाही, राज ठाकरेंचं भाकित, पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारतांना राज ठाकरेंचं भाकित.
- विदर्भातील मनसेमध्ये लवकरंच संघटनात्मक मोठे फेरबदल होतील
- अनेक निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करुन, नव्या चेहऱ्यांना संधी देणार
- अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, जेव्हा अमित निवडणूक लढेल तर गुपचूप लढणार नाही. तुम्हाला ही कळेलच...
* राज ठाकरे निवडणूक लढवतील का यावर थेट उत्तर नाही... मात्र, लढवणार नाही अशीच एकूण प्रतिक्रिया..
- महाराष्ट्र विधानसभा विवडणूकीत कुणाला कौल मिळेल आत्ता सांगता येत नाही..
* राजकीय परिस्थिती आणि पक्षांची एवढी सरमिसळ झाली आहे की मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता.. मात्र इतर पक्षातील बंडखोर आमच्याकडे आल्यास थेट उमेदवारी देणार नाही.. आधी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ नंतर आलेल्यांचा विचार करू..
- लोकसभा निवडणूकीत शरद पवार, आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यांवर पाहून मतदान मिळालं नाही, तर मोदी विरोधी मतदान त्यांना मिळालं
- लोकसभा निवडणुकीत एससी समाज आणि मुसलमानांनी एकत्र महाविकास आघाडीला मतदान केलं, पण विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही . प्रत्येक निवडणूक वेगळी असते
- विदर्भातील बहुतांश जागा लढणार, मात्र, नुसती निवडणुक लढवण्यासाठी उमेदवार देणार नाही.