Raj Thackeray:मोदींच्या गॅरेंटीवर देश पुढे घेऊन जाण्यासाठी राज ठाकरेंनी विचार केला तर स्वागतच : भाजप
Raj Thackeray:मोदींच्या गॅरेंटीवर देश पुढे घेऊन जाण्यासाठी राज ठाकरेंनी विचार केला तर स्वागतच : भाजप
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे (यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते. राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला होता. दिल्लीतील अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होत आहे. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् येथे ही बैठक सुरु आहे. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
