(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Akkalkot : राज ठाकरेंनी अक्कलकोटमध्ये घेतलं स्वामी समर्थांचं दर्शन
Raj Thackeray Akkalkot : राज ठाकरेंनी अक्कलकोटमध्ये घेतलं स्वामी समर्थांचं दर्शन
हेही वाचा :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगावचे नेते प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली असून आपला राजकीय वारसदारही जाहीर केला आहे. मात्र, या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. राजकारणात मोठ्याने कुठे थांबायचं हे ठरवायला पाहिजे, शरद पवारांनी (Sharad pawar) सुद्धा वेळीच थांबायला पाहिजे होतं, असे आमदार सोळंके यांनी म्हटलं. आता, आमदार सोळंके यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पलटवार होण्याची शक्यता आहे. कारण, शरद पवारांची ओळख आजही 83 वर्षांचा तरुण म्हणून राष्ट्रवादीकडून करुन दिली जाते. तर, स्वत: शरद पवार हेही मी काय म्हातारा झालोय का, असे म्हणत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
राज्यामध्ये चुलत्या पुतण्याच्या राजकारणामध्ये अनेक कुटुंब विभक्त झाल्याचे उदाहरण समोर असतानाच मागच्या चार ते पाच दशकापासून सक्रीय राजकारणात असलेल्या सोळंके कुटुंबाने मात्र वेगळा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी राजकीय निवृत्ती घेताना चक्क त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके हेच आगामी राजकीय वारसदार असतील अशी घोषणा देखील केली. या घोषणेनंतर प्रकाश सोळंके यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामध्ये, राजकीय निवृत्तीचं कारण देत शरद पवारांनाच टोला लगावल्याचं दिसून आलं.