एक्स्प्लोर

बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?

मनसेनं यंदाच्या निवडणुकीत 128 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून उमेदवार दिले होते.

ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात यंदा भाजप महायुतीने तब्बल 237 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवत देदीप्यमान विजय मिळवला आहे. महायुतीचा हा विजय अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. त्यामुळेच, महाविकास आघाडी व इतर पक्षातील नेत्यांनी या विजयानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पराभवाची कारणमिमांसा सुरू केली आहे. विशेष म्हणजे राज्यात 128 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही यंदाच्या निवडणुकीत पदरी मोठी निराशा आली आहे. गत निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार निवडून आला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मनसेला (MNS) एकही जागा जिंकता आली नाही. त्यातच, मनसेच्या जवळपास 100 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच, राज ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर ट्वटि करत अविश्वसनीय आणि तूर्तास एवढेच, असं ट्विट केलं होतं. 

मनसेनं यंदाच्या निवडणुकीत 128 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून उमेदवार दिले होते. उमेदवारी देताना चाळण लावून चांगल्या उमेदवारांना मैदानात उतरवलं होतं. विशेष म्हणजे राज्यात चर्चेत राहिलेल्या बदलापूर बाल लैंगित अत्याचार प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडणाऱ्या, आणि बदलापूर (Badlapur) शाळेतील हे प्रकरण लावून धरलेल्या मनसेच्या रणरागिणी संगिता चेंदवणकर यांनाही राज ठाकरेंनी उमदेवारी दिली होती. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना राज यांनी मैदानात उतरवलं, तसेच बदलापूरमधील बाल लैंगिक प्रकरणाच्या अत्याचाराला सर्वप्रथम समोर आणणारी रणरागिणी म्हणत राज यांनी जाहीर सभेतून त्यांचं कौतूकही केलं होतं. मात्र, येथील मतदारांनी त्यांनीही नाकारलं आहे. 

बदलापूरच्या एका शाळेत 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर, बदलापुरात मोठं आंदोलन उभारलं, त्याचा परिणाम राज्यभराता झाला अन् संतापाची तीव्र लाट पसरली. या घटनेतील आरोपीला अटक झाल्यानंतर पोलिसांकडून न्यायालयीन कामकाजासाठी नेत असताना आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला होता. त्यामुळे, या प्रकरणावर एकप्रकारे पडदा पडला. मात्र, येथील प्रकरण उजेडात आणणाऱ्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यास राज ठाकरे यांनी थेट विधानसभेच्या मैदानात उतरवले. पण, येथील मनसेच्या संगिता चेंडवणकर यांना केवळ 7,894 मतं मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांचंही डिपॉझिट जप्त झालं आहे. येथून भाजप महायुतीचे उमेदवार किसन कथोरे तब्बल 52,392 मतांनी विजयी झाले आहेत, त्यांना 1 लाख 75 हजार 509 मतं मिळाली. तर, दुसऱ्या क्रमांकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुभाष पवार यांना 1 लाख 23 हजार मतं मिळाली आहेत. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या अपेक्षेनं महिलांच्या प्रश्नावर व बाल लैगिंक अत्याचाराच्या घटनेवर आवाज उठवणाऱ्या संगिता चेंदवणकर यांना तिकीट दिलं. मात्र, त्यांचा दारुण पराभव झाला.    

मुरबाड विधानसभेत 2019 साली कोण विजयी

किसन कथोरे (भाजप) - 1,74,068 मते (विजयी) 
प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी काँग्रेस) - 38,028 मते 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget