Walmik Karad Profile : कोण आहेत वाल्मीक कराड? आतापर्यंतचा इतिहास काय?
Walmik Karad Profile : कोण आहेत वाल्मीक कराड? आतापर्यंतचा इतिहास काय?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) तपास काही दिवसांपूर्वी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. सीआयडीच्या तपासातील जवळपास 5 मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. यामध्ये अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवर आरोपींचे ठसे जुळल्या आहेत. याशिवाय आरोपींच्या बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. याबाबतची माहिती सूत्रांनी दिलीये.
वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित महिलेची चौकशी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडी चे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेले एका महिलेची आज सकाळपासून चौकशी सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.