एक्स्प्लोर
Narendra Modi :'पंतप्रधान Modi हे अध्यक्ष Trump यांना घाबरतात', Rahul Gandhi यांची थेट टीका
विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना घाबरतात,' असे थेट वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार की नाही, याचा निर्णय ट्रम्प घेत असल्याचा आणि तरीही मोदी त्यावर काही बोलत नसल्याचा आरोप गांधींनी केला. दुसरीकडे, अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल पुरस्कारावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपण भारत-पाकिस्तानमधील युद्धासह अनेक युद्धे टाळण्यासाठी व्यापार आणि दडपणाचा वापर केला, पण तरीही आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला नाही, असे ट्रम्प म्हणाले. आपण आठ महिन्यांत आठ युद्धं थांबवली असल्याचा दावाही त्यांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















