Pratap Sarnaik on EV : इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही
Pratap Sarnaik on EV : इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही
- इमारतीमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही असा निर्णय आम्ही घेत आहोत - जरी हा कटू निर्णय असला तरी पुढील काळासाठी हा निर्णय घ्यावा लागेल - यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू आहे - आमदार खासदार निधीतून चार्जिंग स्टेशन उभारण्याचाही प्रस्तावित केला आहे - जर नियमित केलं तरच यावरती तोडगा निघू शकेल
हे ही वाचा..
राज्यात दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल (SSC Results) जाहीर आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये, कोकण विभागाने 98.8 टक्के निकाल घेत राज्यात बाजी मारली. महाराष्ट्रातील एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 94.10 लागला आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील भाई सथ्था नाईट स्कूल या रात्र शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेता चांगले यश मिळवलं आहे. येथील रात्र शाळेमध्ये (School) दहावीचे शिक्षण घेणारे माजी सैनिक अंकुश पानंमद आणि वडापाव विक्रेत्या मंगल रांधवन हे दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. अंकुश पानमंद यांनी 19 वर्षे देश सेवा केली असून सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अपूर्ण राहिलेले शिक्षण घेण्यासाठी त्यांनी रात्र शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि ते यावर्षी दहावी उत्तीर्ण झाले. अंकुश यांना दहावीमध्ये 60% गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा साहिल पानमंद हा देखील दहावीला होता, त्याला देखील 74 टक्के गुण मिळाले आहेत. दहावीच्या परीक्षेत एकाचवेळी बाप-लेक उत्तीर्ण झाल्याने पानमंद कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.






















