एक्स्प्लोर
Prakash Mahajan VS Bhujbal : गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण? भुजबळांच्या वक्तव्याने नवा वाद
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या राजकीय वारसा हक्कावरून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात वाद पेटला आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर, प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'क्या जमाना आ गया, स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे, एक भ्रष्टाचारी, कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते', असा सणसणीत टोला महाजन यांनी भुजबळ आणि करुणा शर्मा यांना लगावला. बीडमधील एका ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी हे विधान केले होते, ज्यामुळे अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मुंडे भाऊ-बहिणींमध्ये, म्हणजेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे यांच्यात, फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप महाजन यांनी केला. जनतेने आणि समाजाने पंकजा यांनाच आपला नेता मानले आहे आणि त्यांचा संघर्षमय प्रवास पाहता, त्यांना डावलण्याचा अधिकार भुजबळांना नाही, असेही महाजन म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















