Prakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा
Prakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा
मनसेच्या प्रकाश महाजनांनी भाजपच्या पाठिंब्यासंदर्भात एक मोठं विधान केलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा आम्हाला पाठिंबा असल्याचं प्रकाश महाजनांनी म्हटलंय. शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची जी सभा होणार आहे त्या सभेचा फायदा हा अमित ठाकरेंनाच होणार असल्याचा विश्वास एबीपी माझाशी बोलताना महाजनांनी व्यक्त केला. विधानसभेच्या माहिम विधानसभा मतदारसंघात यंदा मनसे, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असा तिहेरी सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही नेत्यांनी आपला पाठिंबा मनसेला असल्याचं म्हटलं होतं तर काही नेत्यांनी महायुतीतील सरवणकरांना पाठिंबा दर्शवला होता.
महत्त्वाच्या बातम्या



















