(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Ambedkar : गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवर बसवावं; दोघांची ताटं वेगळी ठेवून आरक्षण देऊ
Prakash Ambedkar : गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवर बसवावं; दोघांची ताटं वेगळी ठेवून आरक्षण देऊ
ओबीसी समाजाला आम्ही आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यायला लावू, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये (OBC Reservation) कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाही, तसेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सगेसोयरे या मागणीला देखील आमचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. कुणबी हा ओबीसीत (OBC )आहे. त्यामुळे त्यांनी जर कागदपत्र दाखल केले तर त्यांना आरक्षण मिळू शकेल, असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यभरात ओबीसी समाजाच्या ज्या संघटना आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणार आहोत. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात आम्ही राजकीय पक्षांना आपली भूमिका घेण्यासाठी लावणार आहोत. कारण आरक्षणाच्या या लढाईत राजकीय भूमिका महत्त्वाची असून त्यांनी एकदा आपली भूमिका स्पष्ट केल्यावर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाज हा कायदेशीर रित्या समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेत बसावावं. असा आव्हान देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.