Man Ki Baat : वर्षातून एकदा 'नदी उत्सव' साजरा करा, जागतिक नदी दिनानिमित्त पंतप्रधान मोदींने आवाहन
Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 81व्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधानांनी कार्यक्रमाची सुरुवात विश्व नदी दिनाच्या महत्त्वानं केली. आज 'वर्ल्ड रिव्हर डे' आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यक्रमात नद्यांच्या महत्त्वाबाबत सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "नदी आपल्यासाठी एक भौतिक वस्तू नाही, तर जीवंत अस्तित्व आहे. म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो. आपले कितीही सण-उत्सव असोत, ते सर्व आपल्या या मातेच्या कुशीतच होतात."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आपल्याकडे असं म्हणतात की, "पिबन्ति नद्यः, स्वय-मेव नाम्भः" अर्थात नद्या आपलं जल स्वतः पित नाहीत, तर परमार्थासाठी देतात. आपल्यासाठी नद्या एक भौतिक वस्तू नाहीत, तर आपल्यासाठी नद्या जीवंत अस्तित्व आहेत. म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो. आपले कितीही सण-उत्सव असोत, ते सर्व आपल्या या मातेच्या कुशीतच होतात."