Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाची मूर्ती पेटीतून बाहेर काढणार, वारकऱ्यांमध्ये आनंद
Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाची मूर्ती पेटीतून बाहेर काढणार, वारकऱ्यांमध्ये आनंद
गेली दोन महिने काचपेटीत बंद असलेला विठुराया आज काचपेटीतुन मुक्त झाला असून आज मोहिनी एकादशीला आलेल्या भाविकांना देवाचे दगडी गाभाऱ्यातील मूळ रूपाचे मुखदर्शन घेता आले आहे . सध्या मंदिराचे दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम सुरु असल्याने १५ मार्च पासून देवाचे काचपेटीतील रूप दुरून पाहता येत होते . मात्र आता गाभाऱ्यातील बहुतांश काम पूर्ण झाल्याने देवाच्या भोवती मूर्तीच्या संरक्षणासाठी लावलेली अन ब्रेकेबल काचेची पेटी हटविण्यात आल्याने दगडी गाभाऱ्यातील देवाच्या मूळ रूपाचे दर्शन घेऊन भाविक तृप्त झाले . आता २ जून पासून देवाच्या पायावरील दर्शनाला सुरुवात होणार असून आता भाविकांना पायावरील दर्शनाची आस लागून राहिली आहे . आज ABP माझाच्या माध्यमातून देवाचे हे दगडी गर्भगृहातील मूळ रूपाचे exclusive दर्शन घेता येत आहे.