एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाचा प्रादुर्भाव अन् माघी यात्रेमुळं पंढरपुरात निर्बंध; आज रात्रीपासून 2 दिवसांसाठी देऊळ बंद
पंढरपूर : कोरोनाच्या संकटाचा फटका नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाच्या माघी यात्रेलाही बसला असून आज रात्री 10 वाजल्यापासून 24 फेब्रुवारी सकाळपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. उद्या माघ शुद्ध दशमीच्या रात्री बारापासून एकादशीच्या रात्री बारापर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावांत संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. या यात्रेसाठी भाविक अथवा दिंड्यानी येऊ नये म्हणून त्रिस्तरीय नाकेबंदी लावण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी चैत्री, आषाढी आणि कार्तिकी या वारकरी संप्रदायाच्या यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल 10 महिन्यानंतर दिवाळी पाडव्याला विठ्ठल मंदिराची दारे भाविकांना मर्यादित स्वरूपात खुली झाली होती. मात्र नवीन वर्षात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने माघी यात्राही भाविकांसाठी रद्द करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. या यात्रेच्या काळात कोणत्याही दिंडी अथवा भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उद्या रात्रीपासून 24 तासांची संचारबंदी लावण्यात आली असल्याने रस्त्यावर कोणालाही बाहेर पडत येणार नाही. यापूर्वी शहरातील जवळपास 1200 मठ आणि धर्मशाळेत आलेल्या भाविकांना यात्रा काळात निवास करण्याची परवानगी देऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व मंथन नोटीस बजावल्याने आता वारकरी संप्रदाय आणि पोलीस यांच्यात संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. जे भाविक यापूर्वीच शहरात आलेत त्यांना बाहेर काढू नये असा इशारा आज बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement