एक्स्प्लोर
OBC Reservation Row: 'Vikhe पाटलांना सोडणार नाही', मंत्री Bhujbal यांचा सरकारलाच घरचा आहेर
बीडमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार सभेत (OBC Mahaelgar Sabha) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट सरकारमधील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विकार पसरवून गेला आहे... आम्ही त्यांना सोडून सोडणार नाही, गप्प बसणार नाही,' असा थेट इशारा भुजबळ यांनी दिला. या सभेत भुजबळ यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर देताना भाजप नेत्यांनाही 'तुमच्या लोकांना आवरा' असे सुनावले. दुसरीकडे, या टीकेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून, भुजबळ यांच्यासोबत बसून गैरसमज दूर करण्याची तयारी दर्शवली आहे. न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून पुढे आलेल्या निष्कर्षांवर अंमलबजावणी केली जात असून, भुजबळ आणि शिंदे साहेबांसोबत एकत्र बसून हा विसंवाद दूर करू, असे विखे पाटील म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















