Nilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंके
Nilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंके
Santosh Deshmukh Murder Case मस्साजोग: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांसोबत निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे उपस्थित होते.
शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम (Sharad Pawar Meet Santosh Deshmukh Family) कुटुंबियांकडून समजून घेतला. शरद पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सात्वन केलं. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पावरांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. आम्ही सगळे भयभीत आहोत. उद्या कुणाचा नंबर लागेल, याचा नेम राहिला नाही, असं गावकरी म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली.
आम्हाला काहीच नको, न्याय हवाय-
पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला, त्याबाबत खोटं सांगितलं. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा, जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे, त्यालाही अशीच शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला काहीच नको, न्याय हवाय, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे दिली.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
जे घडले आहे. सर्वसामान्य लोकांना धक्का बसला. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणार लोक इथे आहेत. अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणाला ही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली. जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना यांची हत्या झाली. हे चित्र अतिषय गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. जे घडले आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणार लोक इथे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सुधा हा प्रश्न विधानभवनात मांडला. ते कोणत्या जातीचे आहेत, समाजाचे आहेत हे त्यांनी बघितले नाही. कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा, असं शरद पवार यावेळी म्हणाले.