एक्स्प्लोर
NCP Leadership Change | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला नवा 'कॅप्टन', Shashikant Shinde यांच्यावर मोठी जबाबदारी
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात आज नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड झाली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सर्वानुमते शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. शशिकांत शिंदे यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच, बदललेल्या व्यवस्थेबद्दल लोकांमध्ये जागृती करणे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे पालन करत असताना, राज्याचा दौरा करून पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'महिनाभरात पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती पक्षाची जबाबदारी पार पडत असताना राज्याच्या असलेला दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही करेल,' असे त्यांनी म्हटले आहे. पक्ष संघटनेला बळकटी देणे आणि जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
मुंबई






















