Nana Patole Speech Mumbai : माझा एकच मित्र आहे संजय राऊत..नाना पटोलेंचं भाषण, सगळे हसले
Nana Patole Speech Mumbai : माझा एकच मित्र आहे संजय राऊत..नाना पटोलेंचं भाषण, सगळे हसले
ही बातमी पण वाचा
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे, नसीम खान वर्षा गायकवाडांनी मानले आभार
मुंबई : महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणतंही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. जागावाटपावरुन मारामाऱ्या नको अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेच सेक्युलर सिव्हील कोड म्हणजे मोदींनी हिंदूत्व सोडलं का? असा सवाल मविआच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा मोदींना केला आहे. सरकार निवडणुकांना घाबरले आहे. असे जयंत पाटील म्हणाले. महाविकासआघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. खासदार सुप्रिया सुळे, खासदार वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक केलंय, महामेळाव्यात कोण काय म्हणाले हे जाणून घेऊया...
उद्धव ठाकरे काय म्हणाले? (Uddhav Thackeray Full Speech)
निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहे . त्यांनी महाराष्ट्रची निवडणूक सुद्धा आज जाहीर करावी. महाराष्ट्र धर्म रक्षणाची, स्वाभिमान रक्षणाची लढाई आहे. लढाई अशी लढाईची की एक तर तू राहशील नाहीतर मी राहील! होऊन जाऊ दे जे व्हायचे ते होऊन जाऊ दे... सत्ताधारी बघतायत डुबक्या मारून पवित्र होता येईल का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा आहे.
भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला नको आहे. ज्याचा जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असा ठरवलं जायचं. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या पण यामध्ये असा नको आधी ठरवा आणि मग पुढे जा कारण त्यामध्ये धोका जास्त आहे. योजना पोहचवणाऱ्याला 10 हजार महिना दिला जातोय त्यासाठी दूत नेमले. हा लोकांचा पैसा आहे, अशा योजनामध्ये राज्याची लूट हे करत आहेत. आपण नाही होऊ शकणार दूत आपण अडीच वर्ष काय काम केलं ते लोकांपर्यत पोहचवा, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहेत.