Sunil Kedar : तुम्ही गुलाम होते आणि पुन्हा गुलामच होणार,सुनील केदारांचा तीव्र शब्दात ईव्हीएमचा विरोध
Sunil Kedar : नागपूर , रामटेक मतदारसंघात प्रत्येकी 400 उमेदवार उभे राहणार
ईव्हीएमच्या माध्यमातून देशाला पुन्हा गुलाम बनवण्याचे प्रयत्न होत असून लक्षात ठेवा, तुम्ही गुलाम होते आणि पुन्हा गुलामच होणार... अशा तीव्र शब्दात काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी ईव्हीएमचा विरोध केला आहे... इंडिया विरुद्ध ईव्हीएमच्या मोहिमेला त्यांनी पाठिंबा दर्शवला असून नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघात 400-400 उमेदवार उभे करण्याचा इंडिया विरुद्ध ईव्हीएमने निर्धार केलाय... या मोहिमेला सुनील केदार यांनींही पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता नागपूर आणि रामटेक मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी गल्लोगल्ली उमेदवार उभे राहतील का असा प्रश्न निर्माण झालाय...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
