एक्स्प्लोर
Thackeray Brother Bhaubeej : ठाकरे बंधू यांनी सहकुटुंब बहीण जयजयवंती यांच्या घरी साजरी केली भाऊबीज
ठाकरे बंधू उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात वाढलेल्या भेटीगाठी आणि भाऊबीजेनिमित्त (Bhaubeej) झालेले कुटुंबाचे एकत्रिकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. एका वृत्तनूसार, 'राजकीय युती होईल की नाही ते माहित नाही पण आता कौटुंबिक नाती जोडलेली आहेत'. आज भाऊबीजेच्या निमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंब राज ठाकरे यांच्या भगिनी जयजयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. गेल्या साडेतीन महिन्यांतील ठाकरे बंधूंची ही जवळपास नववी भेट असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी MNS च्या दीपोत्सवात उद्धव ठाकरेंनी लावलेली हजेरी, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दिलेली 'मातोश्री' (Matoshree) भेट आणि त्यानंतर आता भाऊबीजेच्या निमित्ताने झालेले हे एकत्रिकरण, या सर्व घटनांमुळे आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















