एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule मुंबईत दस्तऐवज नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादा हटवली,बावनकुळेंचा निर्णय
मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून, मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्यानुसार, आता मुंबईकरांना मालमत्ता करार, भाडेकरार आणि वारसा हक्क पत्रासारखे दस्तावेज शहरातील कोणत्याही सहा प्रमुख मुद्रांक कार्यालयांमध्ये नोंदवता येणार आहेत. यापूर्वी, संबंधित मालमत्ता ज्या भागात आहे, केवळ त्याच भागातील कार्यालयात दस्त नोंदणी करणे बंधनकारक होते, मात्र ही अट आता रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर आणि ओल्ड कस्टम्स हाऊसमधील प्रधान मुद्रांक कार्यालयात कुठल्याही भागातील दस्त नोंदणी करता येईल. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रशासकीय कामांना गती मिळण्यास मदत होईल.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















