(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Muddyach Bola :मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कुणाची हवा?अभिनेता Pandharinath Kamble सोबत मुद्याचं बोला
Muddyach Bola :मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कुणाची हवा?अभिनेता Pandharinath Kamble सोबत मुद्याचं बोला
हे ही वाचा....
शेरोशायरी करत आणि चंद्रकांत पाटील यांच्या एका शब्दावर हजारो लोक काही तासात जमतात, अभिनंदन असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगवात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आयोजित मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. मुक्ताई ज्याला पावते त्याला पावते, नको त्याला नाश करते. अडीच वर्षात पंधरावेळा मुख्यमंत्री या जिल्ह्यात आले आहेत, यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी समोरच्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) कौतुक केलं. तसेच, पंधराशे रुपये मिळू नये यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य होणार नाही, या पंधराशे रुपयाने मार्केटमध्ये चलन वाढलंय. पंधराशे रुपये माणूस आता घरातील बाईकडे मागत आहे, ही शिंदे साहेबाची कृपा आहे. महिलांसाठी अनेक योजना, आजपर्यंत एवढ्या योजना कोणी आणल्या नसेल. त्यामुळे, शिंदेसाहेब निवडणुकीनंतर काय-काय वाढवतील हे सांगता येत नाही, असेही गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी म्हटले. तर, चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ हे सुपरमॅन आहेत, अशा शब्दात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.