एक्स्प्लोर
Voter List Row: 'निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं?', Sanjay Gaikwad आयोगावर नाराज
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही', असे थेट वक्तव्य गायकवाड यांनी केले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याआधीच जाहीर केल्याने ते आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत सुमारे एक लाख बोगस आणि मृत मतदारांची नावे असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. याद्या पारदर्शक करूनच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. गायकवाड आणि इतर नेत्यांच्या मागणीनंतर, निवडणूक आयोगाने दुबार नावे शोधण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















