MLA Audio Clip Viral : ऑडिओ क्लिप माझी नाही, मी शिवीगाळ केली नाही - बबनराव लोणीकर
MLA Audio Clip Viral : ऑडिओ क्लिप माझी नाही, मी शिवीगाळ केली नाही - बबनराव लोणीकर
आता एक बातमी राजकारणाच्या मागच्या खलबताची.. बातमी जालना जिल्ह्यातली आहे. जालन्यातील दोन ज्येष्ठ नेत्यांमधील फोनद्वारे झालेल्या संभाषणाची.. एक भाजपचे तर दुसरे शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे.. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीत कुणाकुणाची वर्णी लावायची याचं सर्व प्लॅनिंग झालं, हे प्लॅनिंग झालं शिंदे गटाचे जालन्यातील नेते अर्जून खोतकर यांच्या बंगल्यावर.. पण प्लॅनिंगला तिसऱ्याच एका ज्येष्ठ नेत्याने सुरुंग लावला. ठरल्याप्रमाणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी बबनराव लोणीकर यांच्या मुलाची निवड झाली नाही, त्याचा राग त्यांनी राजेश टोपे यांच्यावर काढला. ही व्हायरल फोन क्लिप आम्ही तुम्हाला पूर्ण ऐकवू शकत नाही. पण राजकीय नेत्याचं अंतरंग किती घृणास्पद असतं याचा उलगडा व्हावा. छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी झालेल्या जालना (Jalna) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. यातूनच टोपे यांची गाडीची तोडफोड करण्यात आली होती. सोबतच बबनराव लोणीकर यांच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले होते. दरम्यान, आता या दोन्ही आमदारांची एक तथाकथित ऑडीओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्यात एक आमदार दुसऱ्या आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या तथाकथित ऑडिओची क्लिपची 'एबीपी माझा' पुष्टी करत नाही.