Dombivli MIDC Blast : डोबिंवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट ABP Majha
डोंबिवलीत असणाऱ्या एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटाचे नेमके कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, डोंबिवली एमआयडीसीपासून (Dombivli MIDC) लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. यावरुन स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज बांधला जात आहे. एमआय़डीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते.
प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील अमोधन केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाला आहे. या कंपनीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहे. हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.