एक्स्प्लोर
Maratha Reservation: भुजबळांच्या भूमिकेवर Ajit Pawar नाराज, पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम?
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या निर्णयाविरोधातही त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. भुजबळांच्या या भूमिकेवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी ही नाराजी बोलून दाखवली. या बैठकीला छगन भुजबळ स्वतः उपस्थित होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मूळ वोट बँक मराठा समाज असल्याने, भुजबळांच्या आरक्षणाच्या भूमिकेमुळे वोट बँकेला धक्का बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बैठकीत अजित पवार म्हणाले, "काही नेते विशिष्ट जातीवरती टोकाची भूमिका घेतायत. अशा नेत्यांच्या मतांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळती आहे. त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाला किंमतही मोजावी लागते." यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली की, "अजित पवार यांनी मला नाही बोलले आणि मला काही बोलायचं असते तर सरळसाधड बोलले असते." त्यांनी स्पष्ट केले की, ते मागासवर्गीयांसाठी लढत आहेत आणि याच कारणामुळे त्यांनी पस्तीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडली होती.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement





















