Manoj Jarange Dasra Melava | मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला पोलिसांची परवानगी नाही
Manoj Jarange Dasra Melava | मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला पोलिसांची परवानगी नाही
हे देखील वाचा
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
जालना : देशातील दोन राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निकालात भाजपला चांगलं यश मिळालं असून हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सत्ता काबिज करण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे, भाजप नेत्यांचा विश्वास वाढला असून हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुती व भाजपला मोठं यश मिळेल, असं भाजप नेते सांगत आहेत. त्यातच, हरियाणामध्ये (Hariyana) जाट समाजाविरुद्ध ओबीसी मतदान एकटवल्यामुळे भाजपचा तिथं विजय झाल्याचं मत नोंदविण्यात येत असल्यासंदर्भात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, कधी हिंदुत्व म्हणतात, कधी ओबीसी म्हणतात यांचे यांनाच कळत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्रात तिकडे आणि इकडे फरक आहे, हरियाणात एखादा मराठा, एखादा जाट किंवा एखाद्या शेतकऱ्याने मतदान केलंच असेल ना, मतदान होऊन गेलं की हे असं बोलतात. हे उपकार फेडणारे लोकं आहेत, होऊ गेलं की दुसऱ्याचं नाव घेतात, असे म्हणत मनोज जरांगे यांनी हरियाणा व महाराष्ट्रातील राजकारण वेगळं असल्याचं म्हटलं.