Manoj jarange And Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावर जरांगे-फडणवीस चर्चा
Manoj jarange And Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावर जरांगे-फडणवीस चर्चा
मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर केली जाणारी आगपाखड आता महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मात्र काल मध्यरात्री मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाली. मराठा आरक्षण आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासंदर्भात फडणवीसांशी चर्चा झाल्याचं जरांगेंनी सांगितलं. फोनवरचं हे संभाषण घडवून आणलं ते मंत्री अब्दुल सत्तार यांनी.. अब्दुल सत्तार काल १०० गाड्यांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल झाले. पहाटे अडीच वाजेपर्यंत मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात चर्चा झाली.. मराठा आणि मुस्लिम यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना जरांगेंनी व्यक्त केल्याची माहिती सत्तार यांनी दिलीय.























