Manoj Jarange Akluj Full Speech : सरकारला एक तासही देणार नाही, अकलुजमधील जरांगेंचं घणाघाती भाषण
Manoj Jarange Akluj Full Speech : सरकारला एक तासही देणार नाही, अकलुजमधील जरांगेंचं घणाघाती भाषण...
सोलापूर : "आपल्यावर खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला लागणार आहे. त्यामुळे हा पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की आरक्षण पदरात पडलंच पाहिजे, असं कळकळीच आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील हे आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या दौऱ्यावर असून आज या ठिकाणी मराठा बांधवांची भव्य सभा होत होत आहे. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना सूचक सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले, "आपल्या समाजासाठी अनेकांनी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. अण्णासाहेब पाटलांपासून, अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, वडजे पाटलांपासून, विनायक मेटे साहेबांपर्यंत बलिदान दिले असून काकासाहेब शिंदेपासून आत्तापर्यंत 55 पेक्षा जास्त बांधवांनी बलिदान दिले आहे, ते आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्यासाठी त्यांच्या बायकोच्या कपाळावरच कुंकू पुसलं याची आठवण आपल्याला ठेवायला लागणार आहे. एवढा मोठा समाज असताना त्यांच्यावर मायचं छत्र आपल्याला धराव लागणार आहे. आता पुढच्या काळात अन्याय होऊ द्यायचा नाही, हा लढा शेवटचा आणि पहिला समजून इतक्या ताकदीने लढायचा की मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलंच पाहिजे"
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/1a11a5666ab771195ea6b9e634a2331c1737914296329977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ambadas Danve Vs Sandeepan Bhumre | अंबादास दानवेंची भुमरेंसोबत जवळीक? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/518b40014f00779ad6ea02687ae0cda51737912152872977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/a2c04c93b63f3587cdea8ab173a6d3531737904407508977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/925a04ae4efbfeac54589aa584a369181737899767917977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/d5d9de96cdd14fbaaabeb9b81bf1f69c1737898705670977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)