Mallikarjun Kharge On Wayanad Lok Sabha : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार- खर्गे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवल्याने राहुल गांधी दोन मतदारसंघातून खासदार आहेत. पण, त्यांना दोन पैकी एक खासदारकी कायम ठेवून दुसऱ्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवत वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
यसोबतच काँग्रेसने आणखी एक मोठी घोषणा करत वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारही जाहीर केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वायनाड पोटनिवडणूक लढवणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रियंका गांधी यांची ही पहिली निवडणूक असणार आहे.





















