Majha Vital Maji Wari : 11 July 2024 : माझा विठ्ठल माझी वारी : माऊलींची पालखी नातेपुतेमध्ये मुक्कामी
Majha Vital Maji Wari : 11 July 2024 : माझा विठ्ठल माझी वारी; पाहा वारी स्पेशल विशेष कार्यक्रम माऊलींची पालखी नातेपुतेमध्ये मुक्कामी
मुंबई: महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरात सध्या लाखो भाविक आषाढी एकादशीच्या (Pandharpur Ashadhi Wari 2024) पार्श्वभूमीवर दाखल होऊ लागलेत. मात्र येथील घाटाची दुर्दशा झाल्यानं इथं अपघात होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. याची दखल घेत घाटात कोणताही अपघात होणार नाही यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं (Mumbai High Court) राज्य सरकारला निर्देश दिलेत.
काय आहे याचिका?
पंढरपुरातील चंद्रभागा नदी काठावरील घाटाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. मात्र ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात कुंभार घाटावरील निर्माणाधीन भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. घाट सुशोभीकरणाच्या कामात वापरण्यात साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलं होतं.