Majha Puraskar : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतला माझा पुरस्कार सोहळा संपन्न
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून नुकतंच माझा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात '३८ कृष्ण व्हिला' या नाटकासाठी डॉ. गिरीश ओक यांना, तर 'चारचौघी' नाटकासाठी मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा माझा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये हा सोहळा संपन्न झाला. अभिनेता शंतनु मोघे, अभिनेत्री लेखिका डॉ. श्वेता पेंडसे आणि नेपथ्यासाठी संदेश बेंद्रे तर, सर्वोत्कृष्ट अनुवाद म्हणून ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाकरता अनघा लेले यांचाही सन्मान करण्यात आला. पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी यांचाही विशेष गौरव झाला. तसंच कॅन्सरवर मात करणारी युवा लेखिका सृष्टी कुलकर्णी आणि तिचे पती डॉ. अवधूत दीक्षित यांचा विशेष गौरव करण्यात आला.