Mahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला? ABP Majha कडे EXCLUSIVE
Mahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला? ABP Majha कडे EXCLUSIVE
राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांचं भरभरून दान दिलं आहे. दरम्यान, आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे विरोधक मात्र या निकालावर संशय व्यक्त करत आहेत. या निकालात काहीतरी घोळ आहे. ईव्हीएम हॅक करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने मतमोजणी करण्यात आली, असे वेगवेगळे आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, वरिष्ठ वकील असीम यांनी या निकालाविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक उमेदवार मला संपर्क करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात असीम सरोदे थेट न्यायालयात जाणार आहेत. एवढं राक्षसी बहुमत महायुतीला मिळणं शक्य नव्हतं, असा दावा त्यांनी केलाय. तसेच लागलेला निकाल हा शंकास्पद आहे. या निकालाविरोधात अनेक उमेदवार मला संपर्क करत आहेत. या उमेदवारांनी न्यायालयात जायचं ठरवलं आहे. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी मला संपर्क केला आहे, अशी माहितीही असीम सरोदे यांनी दिली आहे. माजी अधिकाऱ्यांनी समोर आलं पाहिजे उमेदवार नाही तर मतदारदेखील या निवडणुकीच्या निकालाला आव्हान देऊ शकतो. मतदारांनी या निकालाला आव्हान दिलं पाहिजे. ईव्हीएम यंत्रणामध्ये काम करणाऱ्या माजी अधिकाऱ्यांनी यामध्ये कसा गोंधळ होतो, हे सांगितलं पाहिजे. त्यासाठी माजी अधिकाऱ्यांनी समोर आलं पाहिजे, अशी अपेक्षाही सरोदे यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे महायुतीतील घटकपक्ष सरकार स्थापन करण्यासाठी लगबग करत आहे. तर दुसरीकडे सरोदे यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता सरोदे आगामी काळात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.